मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क...

 0
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क...

आयुक्त जी. श्रीकांत यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 15(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी आज मनपा प्राथमिक विद्यालय, जवाहर कॉलनी या मतदान केंद्रावर आपल्या परिवारासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून मतदानाद्वारे सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन घडविण्यास हातभार लागतो, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच शहरातील सर्व पात्र मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महानगरपालिका प्रशासनामार्फत मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पडली. यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow