मनपा सिबिएसई प्रियदर्शनी शाळेचा निकाल जाहीर...!

 0
मनपा सिबिएसई प्रियदर्शनी शाळेचा निकाल जाहीर...!

मनपा सीबीएसई प्रियदर्शनी शाळेचा निकाल जाहीर!!

मनपा प्रियदर्शनी शाळेत 15 एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन...

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) मनपाच्या केंद्रीय प्राथमिक सीबीएसई विद्यालय प्रियदर्शनी या शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

       गुणवंत विद्यार्थ्यांना उपायुक्त अंकुश पांढरे व मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्रथम तीन विद्यार्थी

ज्युनिअर केजी चे गुणवंत विद्यार्थी

 प्रथम विरांशी पखाले

 द्वितीय विनिष्का दाभाडे तृतीय प्रणाली दाभाडे

सीनियर केजी चे गुणवंत विद्यार्थी प्रथम प्रांजल शिंदे द्वितीय ऐमन शेख , अश्र्वेद पाईकराव

तृतीय मोहम्मद साद

वर्ग पहिला प्रथम ओरियांशी पाखले द्वितीय क्रांती परांडे तृतीय जैनेब सय्यद.

दित्या अनिल घनसावंत हिला स्टुडन्ट ऑफ द इयर हे मानांकन देऊन गौरविण्यात आले.

यावेळेस पालक सभेमध्ये उपायुक्त अंकुश पांढरे यांनी मुलांच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व पालकांनी मतदानामध्ये सहभाग घेऊन मतदानाचे टक्केवारी वाढवावी येणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त गुढीपाडवा मतदान वाढवा ही घोषणा देऊन पालकांमध्ये जनजागृती केली.

पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त करत असतांना निलोफर पठाण यांनी मनपा च्या शाळेत उत्तम शिक्षण मिळते .

खाजगी शाळांपेक्षा मनपाच्या शाळांमध्ये असलेल्या सुविधा व मोफत शिक्षण यामुळे गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षक मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

तसेच रुकैया सय्यद म्हणाल्या की मनपा शाळेबद्दलची पालकांमधील असलेली नकारात्मक भावना प्रियदर्शनी शाळेने बदलून टाकली आहे येथील मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत व आमच्या पाल्यांमध्ये होणारा बदल हा निश्चित लक्षणीय आहे.

 मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रयत्नातून सर्व शाळांमध्ये टर्फ चे मैदान तसेच अनेक खेळाच्या सुविधा मिळत असल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले व मनपा आयुक्त यांचे आभार मानले.

मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांसाठी 15 एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे असे पालकांना सांगितले.

यावेळेस सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे ,तसेच शिक्षिका तेजस्विनी देसले रश्मी होनमुटे स्वाती डिडोरे मनीषा पगडे उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow