महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आज महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सकाळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त लखीचंद चव्हाण ,मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, सहायक आयुक्त संजय सुरडकर,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद ,कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महानगरपालिका मुख्यालय येथे उप आयुक्त लखीचंद चव्हाण यांच्या हस्ते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ लिपिक निकम, माहिती व जनसंपर्क विभागाचे कनिष्ठ लिपिक संतोष कोठाळे ,अतुल बनकर , करण साळवे आदींची उपस्थिती
होती.
What's Your Reaction?