महापालिका, वर्धापन दिनानिमित्त आनंद नगरीचे आयोजन...

 0
महापालिका, वर्धापन दिनानिमित्त आनंद नगरीचे आयोजन...

महानगरपालिका, वर्धापन दिनानिमित्त आनंद नगरीचे आयोजन...  

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)-महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या संकल्पनेतून तसेच उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शना मध्ये आज मनपा व प्राथमिक माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा शाळेमध्ये आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदनगरीचे उद्घाटन महानगरपालिका शिक्षणाधिकारी भरत तीनगोटे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद बारबोटे होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारा विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदिरानगर बायजीपुरा शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे यांनी केले.

 या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी तसेच पालकांनी नगरीचा आनंद घेतला. आनंद नगरी मध्ये सदर खान है पठाण , सुनील नरवाडे ,किशोर दांडगे तसेच सचिन गायकवाड सहशिक्षक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow