महापालिका निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीची स्थापना...
मनपा निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - आगामी महापालिका निवडणुक व जिल्ह्यात होत असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीची स्थापना केली असल्याची पत्रकार परिषदेत फैसल खान यांनी घोषणा केली आहे. पैठण नगराध्यक्ष व सात नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहे. 13 पक्ष व संघटना मिळून हि आघाडी बनवून निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीत शहर नशा मुक्त करने, पाण्याचा प्रश्न मिटविणे, मनपाच्या सर्व शाळेत सिबिएसई पॅटर्न लागू करणे, युवकांना रोजगार मिळवून देणे व आरोग्य महीलांच्या समस्या सोडविण्यासाठी या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विजय कंधारे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष मोहम्मद बाहऊद्दीन, तहरिक-ए-खुदादत मन्सूर अली टिपू, आझाद स्वामीभीमानी सेना अध्यक्ष अन्सार कादरी, भ्रष्टाचार विरोधी समिती संस्थापक सय्यद साबिर सौदागर, आतार बिरादरी संघटना अध्यक्ष सोहेल सिद्दीकी, एस.आर.पी.(सत्यवादी रिपब्लिक पाॅवर) अध्यक्ष सज्जाद शब्बू लखपती, लोकशाही विचार आंदोलन महासचिव मेहराज खान, आवाज संघटना अध्यक्ष जयदिप शिंदे, जलजिवन संघटना अध्यक्ष मिर्झा जलिल बेग, राष्ट्रीय टायगर सेना अध्यक्ष अर्शद खान, वसीम खान यांची प्रमुख उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?