माजी नगरसेवक सय्यद खुसरो यांचे दु:खद निधन

 0
माजी नगरसेवक सय्यद खुसरो यांचे दु:खद निधन

माजी नगरसेवक सय्यद खुसरो बुरहानोद्दीन यांचे दु:खद निधन 

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) आज सोमवारी नुरकॉलनी जुनाबाजार येथील माजी नगरसेवक सय्यद खूसरो बुरहानोद्दीन ( वय 59) हजरत सय्यद शाह नुरोद्दीन हुसैनी चिश्ती कलिमी दर्गाचे सज्जादा नशिन तसेच महानगरपालिकाचे माजी वार्ड सभापती यांचे आज सकाळी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

सय्यद खुसरो यांची नमाज-ए -जनाजा बुड्डीलेन येथील जामा मस्जिद येथे दुपारी दोन वाजता अदा करून सय्यद शाह नुरोद्दीन दर्गा नुरकॉलनी येथे दफविधी पार पडला.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, बहिण, नाते पोती असा मोठा परिवार आहे.

सय्यद खुसरो यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करीत आहे. सय्यद खुसरो हे मनमिळावू असे व्यक्तीमत्व होते तसेच ते अनेकांच्या सुख दुखात अवर्जून उपस्थित राहायचे शहरात ते सर्वाचे परिचित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow