मार्टीची अंमलबजावणी कधी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
मार्टीची अंमलबजावणी कधी... मुख्यमंत्र्यांना निवेदन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) शासनाची स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेच्या वतीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सर्व योजनेचा लवकर लाभ मिळणे बाबत मार्टि कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय विभागीय आयुक्त कार्यलय मार्फत निवेदन सादर
महाराष्ट्र विधानमंडळ हिवाळी अधिवेशनात अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) शासना मार्फत स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेची अंमलबजाणी बाबत निर्णय घेणे.
अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन" .शासन निर्णय दि. 22 ऑगस्ट, 2024
आवश्यक समानता अणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करणे बाबत शासन निर्णय दि 25 जुलै 2024
अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) स्थापन करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 7 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता दिली. ही स्वायत्त संस्था अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक पाठबळ मिळेल.
आर्थिकतरतूद : अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) स्वायत्त संस्थे साठी चालू आर्थिक वर्षात अंदाजीत 1000 कोटींची तरतूद करण्यात यावी
कंपनी नोंदणी आणि दस्तऐवज:अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) संस्थेची कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 नुसार नोंदणीसाठी मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MOA) आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन (AOA) तयार करणेः ज्यामुळे तिच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. त्यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेला मजबूती मिळेल.
मुख्यालय उभारणी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे तात्पुरत्या कार्यालयाची स्थापना आणि मुख्यालयासाठी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ही प्राथमिक गरज आहे. यामुळे संस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहील भविष्यातील योजनांसाठी सुसज्ज वातावरण तयार होईल.
समन्वय समिती: राज्य मंत्रिमंडळाने विविध सारथी, बार्टी, महाज्योती ,अमृत, टार्टी स्वायत्त संस्थांमधील योजनांमध्ये समन्वय आणि एकसमानता आणण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी समिती स्थापन केली आहे अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित केले आहे त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) संस्थेच्या योजनांमध्ये समन्वय आणि एकसमानता आणण्यासाठी चालू आर्थिक वर्षात कृती आराखडा तयार करून अधिक प्रभावी योजना राबविण्यात यावी.
शैक्षणिक आणि कौशल्यविकास:
• 1.स्पर्धा परीक्षा व फेलोशिप: UPSC, MPSC, IBPS, पोलीस, सैन्य भरतीसाठी विशेष प्रशिक्षण.
• 2.कौशल्य विकास व रोजगार: रोजगार-स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण.
• 3.शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता: आर्थिक सहाय्य व वसतिगृह सुविधा.
• 4.स्वाधार व स्वयंम योजना: आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मदत.
• 5.प्रचार प्रकल्प: समतादूत व तारादूतद्वारे योजनांची जनजागृती.
मार्टि संस्थेची त्वरित अंमलबजावणी झाल्यास अल्पसंख्याक समुदायाच्या शैक्षणिक, सामाजिक, व आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक पाठबळ मिळेल. यामुळे अल्पसंख्याकांच्या विकासाला नवी गती मिळण्याची खात्री आहे.
आपल्या सूचनेचा शासनाने लवकरात लवकर सकारात्मक विचार करावा, ही अपेक्षा.
निवेदन मार्टि कृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष अॅड अझर पठाण, उपाध्यक्ष सय्यद आसिफ , सरचिटणीस अॅड शेख वासिम कुरेशी, सचिव अॅड शाबाझ पठाण, सहसचिव नबील उज जमान व इतर पदधिकारीचे सह्या आहे.
What's Your Reaction?