मिठाई वाटप करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा...

 0
मिठाई वाटप करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा...

मिठाई वाटप करत धम्मचक्र दिन साजरा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. आंबेडकर नगर येथे आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास पॅंथरनेते लक्ष्मण भुतकर, जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बुद्ध वंदना पठण केली. 

अध्यक्ष लक्ष्मण दादा भुतकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीचा इतिहास पटवुन सांगितले व आजही धम्म जागृती साठी कृतीवादाची मांडणी करणारी माणसे धम्मदीक्षेच्या 69 व्या वर्षी निर्माण करावी लागतील असेही संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी 22 प्रतिज्ञांचे सामूहिक वाचन करून सांगता करण्यात आली व भारतीय दलीत पँथरच्या वतीने कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडेकर यांनी करून याप्रसंगी गीता बाई म्हस्के, सुभद्रा कासारे, पार्वती बाई घोरपडे, दशरथ कांबळे, संजय सरोदे, राजानंद नावतुरे, समाधान कस्तुरे, रामदास पगडे, योगेश जुमडे, उत्तम डोंगरे, जगन्नाथ जगताप, श्रीखंडे, ॲड सतिश राउत इत्यादींचे परिश्रम केले. धम्मपाल दांडगे यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow