मुस्लिम बांधवांनी केली पाऊसासाठी विशेष दुवा...उद्याही विशेष नमाजचे आयोजन
मुस्लिम बांधवांनी केली पाऊसासाठी केली विशेष दुवा...उद्याही विशेष नमाजचे आयोजन
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) मराठवाड्यात मागिल अनेक दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने सर्व हवालदिल झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शेतातील पिक वाळत असल्याने बळीराजा आभाळाकडे आशेने पाहत आहे. पाऊस पडावा व लोकांना व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आज दुपारी तीन वाजता छावणी येथील इदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज(नमाजे इस्तिस्का) अदा करत विशेष दुवा अल्लाहकडे करण्यात आली. दुवा करतांना सर्वांनी अल्लाहकडे क्षमा याचना करत डोळ्यात अश्रू आले. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा याच इदगाहमध्ये विशेष नमाजचे आयोजन पाऊस पडावा व सर्वांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना करण्यात येणार आहे अशी माहिती इमारत-ए-शरीयाचे अध्यक्ष मुफ्ती मोईज कासमी यांनी दिली आहे. आज झालेली नमाज जामा मस्जिदचे इमाम हाफीज जाकीर यांच्या मागे उपस्थितांनी अदा केली. दुवाही त्यांनी केली. हाफीज इक्बाल अन्सारी यांनी बयान केले. येथे वजूसाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.
What's Your Reaction?