मौलाना सलमान अजहरी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी धर्मगुरुसहीत वंचित रस्त्यावर
मौलाना सलमान अजहरी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी धर्मगुरुसहीत वंचित रस्त्यावर...
विभागीय आयुक्त यांना दिले निवेदन... सत्ताधारी पक्षातील नेते विशेष धर्मा विरोधात गरळ ओकतात त्यांना का होत नाही अटक, वंचितच्या नेत्यांचा सरकारला सवाल
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) देशात मुस्लिम दलित अल्पसंख्याक समाजाला सत्ताधारी पक्षाकडून टार्गेट केले जात आहे. मुस्लिम धर्मगुरु यांनी एका कार्यक्रमात कथित भाषण न तपासता गुजरात एटीएसने मुस्लिम धर्मगुरु मौलाना सलमान अजहरी यांना अटक केली यामुळे मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते विशिष्ट धर्माच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्यांच्या विरोधात कलम 153 नुसार गुन्हे दाखल असताना त्यांना अटक केली जात नाही असा सवाल सरकारला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी विचारला आहे. अल्पसंख्याक समाजावर अन्याय केले जात असल्याने वंचित बहुजन आघाडी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करत आहे. मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी विभागीय आयुक्त यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन ट्रान्सीट रिमांड रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल करुन व दाखल गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी वंचितच्या नेत्यांसोबत मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मगुरु यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी वंचितचे नेते अमित भुईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरैशी, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष योगेश बन, मध्य शहराध्यक्ष जलिस अहेमद, पूर्वचे अध्यक्ष मतीन पटेल, जितेंद्र सिरसाट, महेश निनाडे, सतिश गायकवाड, अफसर पठाण, संदीप जाधव, डॉ.तानाजी भोजने, मंगेश निकम, मिलिंद बोर्डे, युनुस शेख, आसिफ अब्रार, अयुब शहा, शेख नईम, अब्दुल सलमान, आदिल कुरेशी, निसार कुरेशी, कदीर अब्दुल रज्जाक, शेख आसिफ, इलियास पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?