राज्य युथ, सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेला उद्यापासून सुरुवात
राज्य युथ, सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेला उद्यापासून पासून प्रारंभ
विभागीय क्रीडा संकुलात आयोजन, 25 जिल्हा संघांचा सहभाग
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युथ, ज्युनियर आणि सीनियर मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेला राष्ट्रीय क्रीडा दिनी गुरुवारी (29 ऑगस्ट) शानदार सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ वैद्य आणि जिल्हा सचिव दीपक रुईकर यांनी दिली. विभागीय क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील 25 जिल्ह्यांचा सहभाग असणार आहे, असे राज्य सचिव संतोष सिंहासने व अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राने आधुनिक वेटलिफ्टिंग साहित्य उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती जिल्हा सचिव दीपक रुईकर यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (30 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता आशियाई बॉडी बिल्डिंग महासंघाचे सरचिटणीस संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ वैद्य हे असतील.
29 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युथ, ज्युनियर व सीनियर गटातील मुलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय 20 पंचांचा सहभाग असणार आहे. त्यात प्रामुख्याने प्रमोद चोळकर, अनिल माऊली, मधुसूदन देशपांडे, सुरेश कुंभार, राजेश कामटे, योगेश चव्हाण, विजय देशमुख यांचा समावेश आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एनआयएस कोच तुषार सपकाळे, गणेश बेटूदे, संतोष आवचार, भीमा मोरे, वरुण दीक्षित, भाऊसाहेब खरात, नयन जाधव, शिवा शिंदे, श्रीकृष्ण रुईकर, सत्यम प्रजापती, सचिन बोर्डे आदींनी पुढाकार घेतला आहे.
What's Your Reaction?