राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त केंद्र प्रमुख श्रीमंत गंगावणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिका-यांनी केले सन्मानित
केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सत्कार
रोहिलागड, दि.25 (डि-24 न्यूज) तालूका अंबड, रोहिलागड येथील बद्रीनाथ बारवाल महाविद्यालय जालना येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त व निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या तर्फे मतदार यादी पुनर्परीक्षण व वेळोवेळी आयोगातर्फे आयोजित केलेल्या खास मोहिमे अंतर्गत व विविध शालेय व मतदार उपक्रम व प्रकल्पाअंतर्गत स्त्री दिव्यांग तृतीय पंथ व मागासवर्गीय मतदारांची विशेष नोंदणी ठरवून दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सुपरवायझर पुरस्कार येथील रोहिलागड केंद्राची केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांना जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप , मनीषा दांडगे, संगीता सुत्रावे, शिक्षणाधिकारी मंगल ताई तुपे, उपशिक्षणाधिकारी विपुल, भागवत विनया वडजे, बद्रीनारायण बारवाल कॉलेजचे प्राचार्य डॉ.भूषण नाफाडे, प्राध्यापक विलास भुतेकर, स्वीप आयकॉन किशोर डांगे, दिव्यांग स्वीप आयकॉन निकेश मदारे, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हा अधिकारी शशिकांत हदगल, जालन्याचे श्रीमती छाया पवार, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके इत्यादी प्रमुख उपस्थिती होती. या यशाबद्दल अंबडचे भागवत देशमुख, ताराबाई बर्डे पिठोरे गटशिक्षणाधिकारी, गोविंद चव्हाण, लक्ष्मीकांत आटोळे, केंद्रप्रमुख विष्णू आर जी माने, श्रीमती कविता गव्हाड, कैलास गायकवाड नालेवाडी, केंद्राची केंद्रप्रमुख अर्जुन गिरी, अशोक ढेरे, श्रीमती सुरेखा परदेशी, दत्ता गायकवाड, केदार दीपक, अष्टेकर जायभाय, रामा वैद्य ,टकले नामदेव, गंगावणे आश्रुबा गवळी, वैष्णव दाणे इत्यादीने अभिनंदन केले.
What's Your Reaction?