रेल्वे, आयपीएफची विशेष मोहीम, 173 जणांवर कारवाई...

रेल्वे, आरपीएफची विशेष मोहीम : 173 जणांवर कारवाई
नांदेड, दि.14(डि-24 न्यूज)-
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातील रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) तर्फे रेल्वे परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत धूम्रपान करणे, अनधिकृत पार्किंग, रूळ ओलांडणे तसेच रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
औरंगाबाद, आदिलाबाद, जालना, नागरसोल व धर्माबाद येथील रेल्वे पोस्टच्या संयुक्त कारवाईत एकूण 173 जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांच्या विरोधात रेल्वे कायद्याअंतर्गत कलम 159, 147 व 167 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सर्व आरोपींना मा. जेएमएफसी/रेल्वे/औरंगाबाद यांच्या कॅम्प कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दंडित केले.
रेल्वे प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी तसेच रेल्वे परिसरात कायद्याचे पालन होण्यासाठी RPF सतत प्रयत्नशील असून अशा मोहिमा पुढेही राबविल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?






