विरोधकांवर तुटून पडले इम्तियाज जलील, 4 जूनला पुन्हा ऐतिहासिक जल्लोष साजरा करण्याचा आत्मविश्वास...!
विरोधकांवर तुटून पडले इम्तियाज जलील, 4 जूनला ऐतिहासिक जल्लोष आत्मविश्वास...!
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) शहागंज येथील निजामोद्दीन चौकात रात्री एमआयएमच्या जाहीर सभेत इम्तियाज जलील आपल्या भाषणात रागाच्या भरात विरोधकांवर अक्षरशः तुटून पडले. यामध्ये त्यांची जीभ घसरली असे आवेशपूर्ण भाषण त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर केले. "संसद मे कानून बनते है वह नचनिया का कोठा नहीं" जो लोग घुम रहे है मेरी शख्शियत बाघाडने मे उनका किरदार मरम्मत मांग रहा है" " जानवरो से सस्ते बिक रहे है इन्सान" " पुरा हिंदूस्थान देखेंगा 4 जून को जश्न हम मनायेंगे" असे वक्तव्य आपल्या भाषणात इम्तियाज जलील यांनी करुन टाळ्या मिळविल्या.
गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडक टिका करत त्यांनी सांगितले एक महीन्याअगोदर शहा यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एमआयएमला हद्दपार करण्याचे आव्हान दिले होते त्यांनी आतापर्यंत आपला हद्दपार करणारा उमेदवार जाहीर केला नसल्याने टिका केली. सरकारी एजन्सीचा दबाव माझ्यावर चालणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्याजासह परत करणार. 4 जून रोजी सर्वात मोठा जल्लोष साजरा करणार असल्याचा इशारा विरोधकांना त्यांनी दिला. 2019 साली झालेल्या ऐतिहासिक विजयात दलित बांधवांचेही ॠण आहे ते मी विसरणार नाही. आज वंचित सोबत नसली तरी ॠण फेडायचे आहे यासाठी ओवेसींना त्यांनी विनंती केली कि अमरावती येथून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा दिला तशाच प्रकारे अकोला येथून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन ओवेसींनी पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम समाजासोबत मराठा, दलित, धनगर व अन्य समाजाचा मला पाठिंबा मिळत असल्याने माझाच विजय दुस-यांदा होईल असा आत्मविश्वास आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?