शेकटा शिवारात वृद्ध महीलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून, ग्रामीण पोलिसांनी केले आरोपीला अटक...

 0
शेकटा शिवारात वृद्ध महीलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून, ग्रामीण पोलिसांनी केले आरोपीला अटक...

शेकटा शिवारात वृद्ध महीलेचा दगडाने ठेचून खून, ग्रामीण पोलिसांनी आरोपीला केले अटक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - मौजे शेकटा शिवारातील गट क्रमांक 19 येथे एका वयोवृद्ध महीलेचा दगडाने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सुंदराबाई नामदेव जाधव, वय 27, राहणार शेकटा, तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे नाव आहे. पोलीस ठाणे करमाड येथे वयोवृद्ध महीलेचा मुलगा संजय नामदेव जाधव यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात घटनास्थळाच्या जवळ घटनेवेळी मेंढपाळ इसम नामें दारकुबा बालाजी भाऊले, राहणार लाडसावंगी तेथे हजर होता. बाळू श्रीरंग बुचडे राहणार शेवगा, यांच्याकडे मेंढ्या सांभाळण्याकरीता असलेला इसम दोन दिवसांपासून कामाला आला नाही गावी निघून गेला अशी माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व करमाड पोलिसांच्या संयुक्त पोलिस पथकाने शिताफीने आरोपीला अटक केली व त्याने खून केल्याची कबुली दिली. मेंढपाळ चारवण्यासाठी वयोवृद्ध महीलेसोबत वाद झाला होता असे तपासात निष्पन्न झाले. आरोपी दारकुबा बालाजी भाऊले याला अटक केली आहे. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णासिंह यांनी दिली आहे.

सदरील कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णासिंह, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा नागरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि संतोष मिसाळे, सपोनि पवन इंगळे, पोउपनि महेश घुगे, पोह कासिम शेख, प्रमोद पाटील, विष्णू गायकवाड, सचिन राठोड, विठ्ठल डोके, सुनील गोरे, गोपाल पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, राहुल गायकवाड, सनी खरात, बलवीर बहुरे, संजय तांदळे, शिवाजी मगर, निलेश कुडे, संदीप कोळगे, योगेश तरमळे, जीवन घोलप तसेच पोस्टे करमाड येथील पोनि सम्राट सिंग राजपूत, पोउपनि निकाळजे, पोह सोपान डकले, सुनिल लहाने, संतोष चव्हाण यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow