सिल्लोडला पाकीस्तान म्हटल्यावरुन अंबादास दानवेंनी घेतला रावसाहेब दानवे यांचा समाचार...!
सिल्लोडला पाकिस्तान म्हटल्यावरून अंबादास दानवेनी रावसाहेब दानवे यांचा घेतला समाचार...!
सिल्लोड,दि.20(डि-24 न्यूज) सिल्लोड पाकिस्तानात आहे का ? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना प्रश्न..
सिल्लोड पाकिस्तान होते तर आतापर्यंत येथील जनतेचे मतदान कसे काय चालले रावसाहेब दानवे यांना अंबादास दानवे यांचा सवाल येथे केला. आयोजित शिवसंकल्प संवाद कार्यक्रमात त्यांनी हा प्रश्न विचारला.
पाकिस्तान म्हटल्यावरून रावसाहेब दानवे यांचा शिवसैनिकांनी सिल्लोड मध्ये निषेध व्यक्त करायला हवा होता. अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी यांनी यावेळी बोलवून दाखवली.
सिल्लोड विधानसभा निवडणुक शिवसेनाच लढवणार...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निर्धार
गद्दारी झाली असली तरीही मागिल विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदार संघात शिवसेनेच्या चिन्हावर आमदार निवडून आला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीतही सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेनाच लढवणार असल्याचा निर्धार शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
शिवसंकल्प मोहिमेनिमित्त ता. २० जुलै रोजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. सिल्लोड तालुक्यात पूर्वीपासूनच शिवसेना संघटना प्रचंड मजबूत असून महायुतीत असताना अनेकदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार शिवसेनेने येथुन निवडून आणलेला आहे. शिवसेना दुसऱ्यांना निवडून आणू शकते तर स्वतःच्या उमेदवाराला का नाही ? असा सवाल शिवसैनिकांना विचारात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना दानवे यांनी यावेळी केली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसल्याने भारतीय जनता पक्षाचे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. आतापर्यंत ते शिवसेनेच्या बळावर निवडून येत होते. या निवडणुकीत शिवसेना सोबत नसल्याचा परिणाम दानवे याना भोगावा लागला. यावरून तुम्हाला शिवसेनेच्या संघटनेची ताकद लक्षात आली असेल. अपराजित वाटणाऱ्या नेत्याचा ती पराभव करू शकते तर आगामी विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदार संघात शिवसेनेचा आमदार का ? करु शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी येथे पुढचा आमदार शिवसेनेचाच असणार असल्याचे ठामपणे सांगितले.
अब्दुल सत्तार राजकीय चातुर्य दाखवून रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचे श्रेय स्वतः घेत आहे. त्यांचा पराभव सामान्य जनतेने केला असून अब्दुल सत्तार श्रेय घेण्यासाठी खोटे बोलत आहे. दानवे निवडून आले असते तर हा विजय सुद्धा माझ्यामुळेच झाला असे ते म्हणाले असते. अब्दुल सत्तार मतलबी असून असे वक्तव्य ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या अशा बोलण्याकडे लक्ष देऊ नका असा खोचक टोला दानवे यांनी लगावला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, तालुकाप्रमुख रघुनाथ घारमोडे, दिलिप मचे, तालुका संघटक भास्करराव आहेर, विधान सभा संघटक रघुनाथ चव्हाण, गुलाबराव कोलते, शहरप्रमुख मच्छिंद्र घाडगे, किसान सेना तालुका संघटक सखाराम हिवाळे, उपतालुकाप्रमुख नारायण आहेर, सोमनाथ बडक, महेंद्र बावस्कर, शिवा गौर, संजय कळात्रे, प्रकाश वराडे, दशरथ सुरडकर, महिला आघाडी जिल्हा संघाटिका राखीताई परदेशी, तसलिम पठाण,युवासेना जिल्हा समन्वयक लखन ठाकूर,कैलास जाधव, तालुकाधिकारी संजय धनवई, रामेश्वर इंडोले व स्वप्नील पाटील उपस्थित होते.
What's Your Reaction?