सिल्लोड एमआयडिसीसाठी भुसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध, अधिकारी माघारी परतले

 0
सिल्लोड एमआयडिसीसाठी भुसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध, अधिकारी माघारी परतले

सिल्लोड, अधिकारी माघारी परतले, शेतकऱ्यांचा जमीन भुसंपादनास विरोध...

सिल्लोड एमआयडीसीला जमीन देण्यास विरोध 

सिल्लोड,दि.22(डि-24 न्यूज) सिल्लोड एमआयडीसी शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

सिल्लोड तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झालेला आहे, शहरात रजाळवाडी, डोंगरगाव, मंगरूळ व मोढा या चार गावात जवळपास 700 हेक्टर जमिनीवर एमआयडीसी आरक्षित करण्यात आलेली आहे. सदर एमआयडीसीच्या आरक्षणाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात व प्रचंड विरोध दाखवलेला आहे. 

शेतकऱ्यांचा वाढता विरोध बघून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यां सोबत चर्चा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी दिनांक 22.11.2023 रोजी सकाळी 11 वाजता चर्चेसाठी आपापल्या गावात उपस्थित राहणे बाबत निर्देश दिले होते. त्यानुसार रजाळवाडी येथील शेतकरी ठरल्याप्रमाणे चर्चेसाठी उपस्थित झाले. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार रमेश जसवंत, नायब तहसीलदार प्रभू गवळी, एमआयडीसीचे सुरसे, तलाठी काशिनाथ ताठे इत्यादी शासकीय अधिकारी उपस्थित होते. परंतु शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची भूसंपादन बाबत चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला व कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी शासनाला देणार नाही, अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून, आपला विरोध प्रदर्शित केला. शेतकऱ्यांचा प्रखर विरोध बघून अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली होती. त्यामुळे त्यांनी चर्चा अर्धवटच सोडून मध्येच काढता पाय घेतला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजकेच अधिकारी मंगरूळ गावात गेले आणि डोंगरगाव या गावात जाण्याचे टाळले. 

परंतु सर्व शेतकरी आपल्या महत्त्वाचे कामे सोडून डोंगरगाव गावात उपस्थित होते. अधिकारी चर्चेस न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड राग व आक्रोश वाढला. त्यांनी मागणी केली, पुढच्या वेळेस चर्चा करावयाची असल्यास सात दिवसा अगोदर लेखी नोटीस द्यावी.

परिस्थिती हातावर जात असल्याचे बघता सिल्लोड तालुक्यात एमआयडीसी निर्माण होईल याबाबत शंका निर्माण झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow