सोमवारी जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा, टिव्ही सेंटरवर जाहीर सभा
 
                                शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवार, 12 रोजी जनसंवाद दौऱ्यावर
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकसभा निवडणूक निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहे. सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी गंगापूर -खुलताबाद, वैजापूर, कन्नड- सोयगाव, पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहे.
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोमवारी, 12 रोजी सकाळी 10 वाजता विमानान शहरात आगमन होईल. दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील, त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. सायंकाळी 7:30 वाजता शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभा हडको टिव्ही सेंटर येथे उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
अशी माहिती उबाठा यांच्या वतीने दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            