हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय सुरू करण्यास विरोध, उबाठा गटाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय सुरू करण्यास विरोध, उबाठा गटाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज) अनेक वर्षांच्या मागणीनंतर मराठवाड्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हज हाऊस सुरू करण्यात आले. या इमारतीत वक्फ ट्रिब्युनलचे न्यायालय सुरू झाले. यावर्षी हज हाऊस मधून यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी गेले. राज्य शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना केली. मोईन ताशिलदार यांना पहिले आयुक्ताचा मान मिळाला याचे स्वागत अल्पसंख्याक समाजाने केले परंतु त्यांचे कार्यालय हज हाऊस येथील प्रार्थना स्थळी बणवणार असल्याची माहिती मिळाली यामुळे मुस्लिम समाजात नाराजी आहे. आयुक्तालयाचे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी बणवावे येथे कार्यालय बणवू देणार नाही या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीचे राज्याचे संघटक समीर जावेद कुरेशी यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की या निर्णयाचा धार्मिक व सामाजिक संघटनांनी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन विरोध करावा. निवेदनात समीर कुरेशी, उप शहर प्रमुख शेख रब्बानी, उप विभागप्रमुख अन्वर फारुकी, उपशाखा प्रमुख असद खान, सय्यद अथर, सलिम शहा यांची सही आहे.
What's Your Reaction?






