14 वर्षाचा रियान फक्त 14 मिनटात धावला 3 Km, खासदार इम्तियाज जलिल यांनी केले कौतुक

14 वर्षाचा रियान फक्त 14 मिनटात धावला 3 Km, खासदार इम्तियाज जलिल यांनी केले कौतुक
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) लिटल फ्लाॅवर इंग्रजी शाळेचा विद्यार्थी रियान खान नासेर खान ज्याचे वय फक्त 14 वर्ष आहे. याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रायन मिनिथाॅन स्पर्धेत तीन किलोमीटरचे अंतर फक्त 14 मिनटे 25 सेकंदात धावत पूर्ण करत विक्रम केला आहे. त्याचे सोबत स्पोर्ट्सचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खासदार इम्तियाज जलिल यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन भविष्यात आणखी प्रगती करुन देशाचे नाव खेळ जगतात उंचावण्यासाठी कौतुक केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा सभागृहात स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्मृती चिन्ह बक्षिस वितरण करुन गौरव करण्यात आला. रियानला स्पोर्ट्स शिक्षक मजहर सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






