आता शत्रु संपत्ती खरेदी करणे सोपे, मुद्रांक शुल्क माफ होणार, मंत्रीमंडळाचा निर्णय...

 0
आता शत्रु संपत्ती खरेदी करणे सोपे, मुद्रांक शुल्क माफ होणार, मंत्रीमंडळाचा निर्णय...

आता शत्रु संपत्ती खरेदी करता येणार, मुद्रांक शुल्क माफ होणार...

शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणार, मंत्रीमंडळाचा निर्णय 

मुंबई, दि.27(डि-24 न्यूज), 

शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.

केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील शत्रू संपत्तीच्या विश्वस्ताद्वारे-सेपी (Custodian of Enemy Property of India) शत्रू मालमत्तांचे जतन, व्यवस्थापन आणि विक्री केली जाते. शत्रू मालमत्ता कायदा, 1968 अनुसार शत्रू संपत्तीचे विश्वस्त संपत्तीचे विक्री करू शकतात.

राज्यात एकूण 428 शत्रू मालमत्ता आहेत. त्या पुढीलप्रमाणे – छत्रपती संभाजीनगर-2, जालना -2, मुंबई-62, मुंबई उपनगर-177, नागपूर-6, पालघर-77, पुणे-4, रत्नागिरी -11, सिंधुदुर्ग-1, ठाणे-86.

युद्धकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. सेपीकडून अशा प्रकारच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात येतो. मात्र या लिलावांस कमी प्रतिसाद मिळतो. सेपीद्वारे विक्री प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मालमत्तेच्या पहिल्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफ केल्यास शत्रू मालमत्ता खरेदीचा खर्च कमी होऊन खरेदीस प्रतिसाद मिळेल. त्यामुळे अशा मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्कात माफी द्यावी, असा प्रस्ताव सेपीकडून महसूल विभागास सादर करण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्कात प्रथम नोंदणी करताना माफी देण्यास मान्यता देण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow