जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, अटक, पोस्टर जाळले...

 0
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, अटक, पोस्टर जाळले...

जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित हुकुमशाही, लोकशाहीचा गळा घोटण्याचा घातकी कट. कायदा रद्द करा – शहर व जिल्हा काँग्रेसचा जनसुरक्षा कायद्याविरुद्ध जोरदार निदर्शने, रस्ता रोको.

पदाधिकाऱ्यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात अटक व सुटका...काँग्रेस अक्रामक, पोस्टर जाळले, गेटवर आंदोलन सुरु केल्याने जिल्हाधिकारी यांनी निवेदन न स्विकारता गाडी मागे फिरल्याने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि‌.17(डि-24 न्यूज) -

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा अध्यक्ष खा.डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष मा. शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर जोरदार निदर्शने, रस्ता रोको करण्यात आले, पोस्टरची होळी करण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे निवेदन मुख्य द्वारावर चिटकवण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातला 72% नक्षलवाद संपवल्याचं म्हणतात. तर ते कोणत्या कायद्याने केले ? नक्षलवाद संपवला म्हणतात तर नवीन कायदा करण्याचा उद्देश काय ? हे विधेयक राष्ट्राच्या सुरक्षेच्या नावाखाली लोकांच्या अधिकारांचे शोषण करणारा एक अत्यंत धोकादायक प्रयोग ठरू शकतो.

यावेळी खा.डॉ. कल्याण काळे म्हणाले की जन सुरक्षा कायदा आणण्याचा हेतू हा सरकारचा शुद्ध नाही. जनसुरक्षा विधेयक म्हणजे सरकारच्या हुकूमशाहीचा नवा डाव. 

भाजप ही लोकशाही न मानणारी आहे व नक्षलवाद्यांच्या नावाच्या आडून राजकीय एजेंडा राबवू पाहणाऱ्या फडणवीस सरकारच्या जनविरोधी योजना हाणून पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत राहणार नाही असे मत यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष मा. शेख युसूफ यांनी व्यक्त केले.

यावेळी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकारी गाडीतून न उतरता, काही वेळ थांबून निवेदन न स्वीकारता निघून गेले. त्यामुळे खा. डॉ. कल्याण काळे व शेख युसूफ यांच्यातर्फे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर चिटकवण्यात आले.

यावेळी पदाधिकाऱ्यांना सिटी चौक पोलीस ठाण्यातर्फे अटक करून काही वेळेनंतर सुटका करण्यात आली.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे व 

शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, जगन्नाथ काळे, मा.आ. नामदेव पवार, विनोद तांबे, ॲड. सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, राहुल संत, हसण्योद्दीन कट्यारे, उमाकांत खोतकर, राहुल सावंत, अनिस पटेल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, संदीप बोरसे, शेख अथर, बाबुराव कवसकर, अनिता भंडारी, चंद्रप्रभा खंदारे, मंजू लोखंडे, महेंद्र रमंडवाल, मोईन इनामदार, अरुण शिरसाट, मुद्दसिर अन्सारी, बाबासाहेब भोसले, इंजि. इफ्तेकार शेख, पप्पू ठुबे, सलीम पटेल, उषाताई खंडागळे, योगेश थोरात, प्रमोद सदाशिवे, प्रशांत शिंदे, रमाकांत गायकवाड, सुनील साळवे, कल्याण चव्हाण, अस्मत खान, रवी लोखंडे, जाफर खान, आकाश रगडे, मोईन इनामदार, मजाज खान, शेख मुश्ताक, नदीम सौदागर, साजेद कुरैशी, संतोष शेजुळ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow