जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची घोषणा, कार्यकर्त्यांचा विरोध, सावेंच्या गाडीचा घेराव , अब्दुल सत्तार यांचा वेगळा निर्णय...
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत युतीची घोषणा, कार्यकर्त्यांचा विरोध, सावेंच्या गाडीसमोर घोषणा
सिल्लोड-सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या 11 जागेवर आमदार अब्दुल सत्तार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. येथे शिंदेंची शिवसेना एकटी लढणार आहे येथे शिवसेना व भाजपाचा मुकाबला बघायला मिळणार आहे....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दिवसभर युती व आघाडी करण्यासाठी बैठकांमध्ये गेले. सायंकाळी भाजपा व शिंदे सेनेत युतीची घोषणा नेत्यांनी केली पण हि युती कार्यकर्त्यांना मान्य नाही. महापालिका निवडणुकीत कटु अनुभव आले असताना भाजपाने शिवसेनेसोबत युती कशासाठी करावी असा सवाल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करत मंत्री अतुल सावे यांना गराडा घातला व युती करु नका अशी घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली.
आज एका हाॅटेलमध्ये भाजपा व शिवसेना नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीत बारा बैठका झाल्या तरीही युती तुटली होती तरीही भाजपाला मोठे यश मिळाले आणि शिवसेनेला मोठे यश मिळवता आले नाही. आता पुन्हा दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अक्रामक पवित्रा घेतला मागिल कटु अनुभव बघता नव्या युतीकडे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव यांच्या उपस्थितीत हि बैठक झाली.
वैजापूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी "युती तोडा" अशी घोषणाबाजी अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला व अक्रामक पवित्रा घेतला. यामुळे महायुती समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट व अतुल सावे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या जागावाटपात भाजपाला 27 तर शिवसेनेला 25 जागा जिल्हा परिषद निवडणुकीत मिळाल्या आहेत. जागावाटपाची चर्चा तणावपूर्ण वातावरणात झाली. बैठकीत जागांच्या वाटपात मतभेद झाल्याने पालकमंत्री संजय शिरसाट संतापून बाहेर आले होते पण खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांची समजूत काढून आत नेले व अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दोन्ही पक्षांमध्ये इच्छूकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक गटात जागांसाठी उमेदवार आग्रही असल्याने बंडखोरीचा दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. कार्यकर्त्यांच्या मते युतीचा निर्णय लादण्यात आला म्हणून युतीला तीव्र विरोध दर्शवला. नेत्यांनी जरी एकतेचा संदेश दिला तरी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याने निवडणूक काळात महायुती समोर आव्हान उभे राहिले आहे.
संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले युती झाली. आमची बीडकीनची जागा गेली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी होत असते ती दुर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
What's Your Reaction?