दिल्ली विस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ एसडिपिआयच्या वतीने कॅन्डल मार्च...
दिल्ली बम विस्फोट घटनेच्या निषेधार्थ एसडिपिआयचा कॅन्डल मार्च...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार विस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ एसडिपिआयच्या वतीने रोशन गेटवर कॅन्डल पेटवून देशातील हुतात्मा नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या आतंकवादी घटनेचा निषेध करत पाकीस्तानवर राग व्यक्त करण्यात आला. आतंकवादाचा धर्म नसतो. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत देशात दोन समाजात तेढ निर्माण करुन निवडणुकीत फायदा घेण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षावर एसडीपिआयचे प्रदेश महासचिव सय्यद कलिम यांनी केले.
याप्रसंगी बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अलियार खान, पिपल्स पार्टी ऑफ इंडियाचे एड विजय वानखेडे, बामसेफचे संतोष साळवे, एसडिपिआयचे जिल्हाध्यक्ष समीर शहा, मोहसीन खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?