पक्षात अंतर्गत विरोध असतानाही दुस-यांदा महीला काँग्रेस शहराध्यक्षपदी दिपाली मिसाळ...!
पक्षात अंतर्गत विरोध असतानाही दुस-यांदा महीला काँग्रेस शहराध्यक्षपदी दिपाली मिसाळ...!
दिपाली मिसाळ व हसनोद्दीन कट्यारे यांचा इब्राहीम पठाण यांनी केला सत्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- काँग्रेस शहराध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी वादविवाद, टिका टिप्पणी व अंतर्गत मतभेद झुगारून दिपाली मिसाळ यांच्यावर काँग्रेस पक्षाने दुस-यांदा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) महीला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान व जवाबदारी असल्याने पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, जास्तीत जास्त महीलांना उमेदवारी कशी मिळेल व पक्ष संघटना आणखी मजबूत करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पैठण येथील माजी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांना सुध्दा शहराध्यक्ष पदासाठी अंतर्गत विरोध होता तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला व शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली.
दोघांचा आज अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते इब्राहीम पठाण यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. याप्रसंगी जेष्ठ नेते इब्राहीम पठाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले पक्षाने विश्वास दाखवत पुन्हा जवाबदारी दिली ती मतभेद विसरून सार्थ ठरवून पक्षाला आगामी निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न करावे.
याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सचिव नासेर खान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आमेर अब्दुल सलिम, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मोईनोद्दीन कुरेशी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान इब्राहीम पठाण, औरंगाबाद मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख फैज, अनुराग दाभाडे, विशाल ढगे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?