पेट्रोल पंपावर तोबा गर्दी, शहरातील अर्ध्याहून जास्त पेट्रोलपंप ड्राय, टँकरचालकांच्या संपाचा फटका
पेट्रोल पंपावर तोबा गर्दी, शहरातील अर्ध्याहून जास्त पेट्रोलपंप ड्राय, टँकरचालकांच्या संपाचा फटका
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील अर्ध्याहून अधिक पेट्रोलपंप ड्राय झाल्याने वाहनधारकांच्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी झाली आहे. सायंकाळपर्यंत अर्ध्याहून अधिक पेट्रोलपंप ड्राय झाल्याने हर्सुल टि पाॅईंटवर हजारो दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या आहे यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने ट्रकचालकांसाठी बनवलेल्या कायद्याविरोधात देशव्यापी संप पेट्रोलपंप टँकर चालकांनी तीन दिवसांच्या संपामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.
मनमाड येथील पानेवाडीतील डेपोवर टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे इंधनाचा पुरवठा होत नसल्याने पेट्रोलपंप ड्राय झाले आहे यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गँस पुरवठा करणारेहि टँकर चालक या संपात सहभागी झाल्याने गँस रिफीलिंगवर परिणाम होणार आहे. नागरीकांना होत असलेल्या या त्रासांमध्ये राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून काही उपाययोजना होताना दिसत नाही. पेट्रोल पंपावर रांगच रांगा दिसत असल्याने पोलिसांचाही बंदोबस्त दिसत नाही.
1 जानेवारी पासून हा संप चालकांनी सुरु केला आहे. केंद्र सरकारने बनवलेला कायदा मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.
कमिशन, मानधन व इतर मागणीसाठी रेशन दुकानदार संपावर गेले आहे. यामुळे सर्व सामान्यांना नवीन वर्षात कोंडी निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर 31 डिसेंबर रोजी माहिती व्हायला झाल्याने वाहनधारकांनी रांगा लावून वाहनांच्या टाक्या भरले. पण आज रात्री पण ज्या पंपावर इंधन आहे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
शहागंज, दिल्लीगेट, कटकट गेट, पोलिस मेस, जालना रोड येथील पंप ड्राय झाले आहे. हर्सुल टि-पाॅईंट या पेट्रोल पंपावर इंधन आहे पण गर्दी फार आहे.
औरंगाबाद पेट्रोलपंप डीलर्स असोशिएशनचे सचिव अखिल अब्बास यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले हा संप पेट्रोल पंप डिलर्सचा नाही तर टँकर चालकांचा आहे. शहरात 50 ते 60 पेट्रोल पंप आहे त्यापैकी पुरवठा होत नसल्याने काही पेट्रोलपंप ड्राय झाल्याने गर्दी झाली आहे. शहराला दररोज दोन लाख लिटर पेट्रोल तर दिड लाख लिटर डिझेल लागते. जेवढी क्षमता असते तेवढेच इंधन स्टाॅक केले जाते.
केंद्र शासनाने केलेल्या जीवघेण्या कायद्याविरोधात हा संप आहे. आंदोलन कंपनी डीलर्स विरोधात नाही. अपघात झाल्यावर लोक चालकांच्या अंगावर येतात, जीवे मारायचा प्रयत्न करतात. अशावेळी अपघातग्रस्तांचा जीव वाचवावे की स्वतःचा जीव वाचवावा. चालकांचा पगार आधीच कमी एवढा मोठा दंड कोठून भरणार. शासनाने आमचा विचार करावा. अशी मागणी वाजिद शेख, भीमराव खरे, आसिफ अली, दिपक शिंदे, धर्मेंद्र प्रजापती, संदीप पाटील, संजय पवार, पापा शेख, शुभम गांगुर्डे, इम्रान खान, विलास औटे यांनी केली आहे. नवीन कायद्याला चालकांचा विरोध आहे. रस्त्यावर अपघात झाल्यावर जखमींना मदत करुन रुग्णालयात पोहचवले नाही तर चालकाला दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंड अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याच्या निषेधार्थ 1 ते 3 जानेवारीपर्यंत इंधन वाहतूक न करण्याचा निर्णय संघटनेने केला असल्याचे या टँकर चालकांनी
सांगितले.
What's Your Reaction?