बायजीपू-यात युवकाच्या खूनाच्या घटनेने खळबळ, परिसरात बंदोबस्त, शांतता
 
                                बायजीपू-यात युवकाच्या खूनाच्या घटनेने खळबळ, पोलिस बंदोबस्त, परिसरात शांतता....
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) बायजीपू-यात गजबजलेल्या ठिकाणी एका चहाच्या हाॅटेलात झालेल्या मारहाणीत एका 22 वर्षीय युवकाचा खून झाला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जीन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे पोहोचले.
गंभीर जखमी अवस्थेत साजेब खान शकील खान, राहणार बायजीपूरा यास खाजगी रुग्णालयात दाखल केले असताना त्याची प्राणज्योत मावळली आहे. मारेकरी घटनेनंतर पसार झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आरोपीचे नाव इक्रार उर्फ छोटू मतीन खान असे नाव आहे.
या घटनेत या युवकाचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती डि-24 न्यूजला जीन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच जीन्सी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मारेकरी लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. यावेळी येथे पोलिस बंदोबस्त आहे.
वाद विवाद कशामुळे झाला त्या कारणांची चौकशी पोलिस करत आहे. मारेकरी कोण हे तपासात कळेल. मागिल वर्षी येथे गोळीबार करत एका युवकाची हत्या झाली होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            