भारतीय दलित पॅंथरच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन...!
भारतीय दलित पँथरचे विभागीय आयुक्तांना निवेदन...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)
भारतीय दलित पॅंथरच्या वतीने
विभागीय आयुक्त कार्यालयसमोर निदर्शने करून मागण्याचे निवेदन देण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा. परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 50 लाख देऊन त्यांच्या कुटुंबातील एका भावाला शासकीय नोकरी देण्यात यावी व याच लढ्यातील दगदगी मुळे पॅंथर लोकनेते विजय वाकडे साहेब यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची सरकारने मदत करण्यात यावी. याच दरम्यान कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात यावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान प्रतिकेची विटंबना करून नासधूस करण्यात आलेल्या माथे फिरूला फाशीची शिक्षा देण्यात यावी. P.I.अशोक घोरबाड यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन निदर्शने करून शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी नेतृत्व लक्ष्मण भुतकर सोबत दशरथ कांबळे, प्रकाश पवार ,संजय सरोदे, नजीम काजी, रामदास पगडे ,अहमद पठाण, शरीफ लाला ,गिताबाई मस्के, पार्वतीबाई घोरपडे सुभद्राबाई कासारे , कलाबाई गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने पॅंथर कार्यकर्ते हो
ते.
What's Your Reaction?