मधुमेह दिनानिमित्त आरोग्य विभागाने घेतली कार्यशाळा...

 0
मधुमेह दिनानिमित्त आरोग्य विभागाने घेतली कार्यशाळा...

मधुमेह दिनानिमित्त आरोग्य विभागाने घेतली कार्यशाळा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ .पारस मंडलेचा ,प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा भोंडवे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या क्रांती चौक आरोग्य केंद्र येथे दिनांक 19/11/2025 रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला.

14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी आरोग्य केंद्र क्रांती चौक येथे मधुमेह तपासणी, निदान, उपचार व उपचार न केल्याने आरोग्यावर होणारे 

दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील धुळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आशा उनवणे यांनी गरोदरपणात होणारा मधुमेह या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये रुग्णांचे रँडम ब्लड शुगर, एच बी ए वन सी ,इ सी जी, फंडोस्कोपी , बीएमआय आणि एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आले. त्याचबरोबर सर्व स्टाफचे सी पी आर ट्रेनिंग घेण्यात आले. तीस वर्षावरील सर्व नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण 139 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी क्रांती चौक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा भोंडवे यांनी उपस्थितांना मधुमेह आजाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अमरज्योती शिंदे ,डॉ.सुनील धुळे, डॉ.आशा उनवणे, डॉ.अश्विनी सिंगू, एनसीडी सहाय्यक श्रीमती ज्योती अमोलिक, मुख्य परिचारिका श्रीमती डक तसेच सर्व परिचारिका, सर्व आशा स्वयंसेविका ,पॅरामेडिकल स्टाफ आणि नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी क्रांती चौक येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow