मनपा शाळेचे विद्यार्थी देणार विक्रम साराभाई सेंटरला भेट, आयुक्तांनी दिले शुभेच्छा...

 0
मनपा शाळेचे विद्यार्थी देणार विक्रम साराभाई सेंटरला भेट, आयुक्तांनी दिले शुभेच्छा...

मनपाचे विद्यार्थी देणार विक्रम साराभाई सेंटर ला भेट

आयुक्तांनी विद्यार्थ्यांना निवासस्थानी बोलावून दिल्या शुभेच्छा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून Smart school to Best School प्रकल्प अंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री मध्ये सन 2024 25 मध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या 1100 विद्यार्थ्यांची Smart Exam वैज्ञानिक क्षेत्रातील अभ्यासक्रमावर घेण्यात आली होती त्यासाठी 600 बहुपर्यायी प्रश्नांची question bank तयार करून देण्यात आली होती तीन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला व त्या साठी शाळा स्तरावर शिक्षकांनी तसेच घरी अगदी पालकांनी त्यांचा अभ्यास करून घेतला होता परीक्षेचे नियोजन mosc परीक्षा सारखे ठेवले होते 

प्रथमता पूर्व परीक्षा शाळा स्तरावर आयोजित करण्यात आली शाळा स्तरावरून 10% विद्यार्थी मनपा स्तरावर मुख्य परीक्षेसाठी पात्र झाली त्या 10% टक्के विद्यार्थ्यांमधून TOP 10 विद्यार्थी निवडण्यात आले होते. या टॉप टेन विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देण्यासाठी आदरणीय आयुक्त तथा प्रशासक यांनी केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो तिरुअनंतपुरम केरळ येथील इस्रो संस्थेला विनंती केली होती या संस्थेने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी दिनांक 17 11 2025 रोजी या स्पेस सेंटरने तारीख दिलेली आहे हे अकरा विद्यार्थी आणि शिक्षक यांची भेट या स्पेस सेंटर येथे होणार आहे .

   त्या साठी उद्या विद्यार्थी विमानाने केरळ येथे जाणार आहेत म्हणून आज आदरणीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जलश्री निवासस्थानी येथे बोलावून घेतले व विद्यार्थ्यांना नाश्ता खाऊ घालून व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून space centre पाहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत 

  व अशीच परीक्षा या वर्षी इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत 

   या वेळी भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी तसेच उमा पाटील,सविता बांबर्डे ,मंगेश जाधव किरण तबडे या शिक्षकासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow