महाराष्ट्रात पंतप्रधानांची एकही सभा होऊ देणार नाही - मनोज जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला इशारा
महाराष्ट्रात पंतप्रधानांची एकही सभा होऊ देणार नाही - मनोज जरांगे पाटील यांचा शिष्टमंडळाला इशारा
आंतरवाली सराटी, दि.13(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशारा भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली असल्याने उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल गेले होते. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने पाणी पिण्याचे व उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता जरांगेंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला व मागणी पूर्ण करण्याची अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली.
सरकारला त्यांनी यावेळी पंतप्रधान यांची सभा राज्यात होऊ देणार नाही असा इशारा शिष्टमंडळाला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांचे घोटाळे मागे घेतले मग पाच महिने झाले तरी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू म्हटले आहे.
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी, आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्या, हैदराबाद गॅझेटप्रमाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी 10 फेब्रुवारी 2024 पासून उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता त्यांची प्रकृती खालावली असल्याने प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. डॉक्टरांनी सुध्दा त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. जरांगे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.
What's Your Reaction?