मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे राष्ट्रपतींना निवेदन, निरपराध मुस्लिमांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी...!

 0
मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे राष्ट्रपतींना निवेदन, निरपराध मुस्लिमांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी...!

मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे राष्ट्रपतींना निवेदन, निरपराध मुस्लिमांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- गेल्या काही दिवसांपासून देशात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रेषित मोहंमद पैगंबर(स.अ.व.स.) यांच्यावर प्रेम व श्रध्दा व्यक्त करत आय लव मोहंमदचे बॅनर लावल्याने निरपराध 400 हुन जास्त मुस्लिम समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. धर्मगुरु मौलाना तौकीर रजा व अनेक तरुणांना तुरुंगात पाठवले. प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर प्रेम व श्रध्दा व्यक्त करणे गुन्हा आहे का...? त्यांच्या घरांवर उत्तर प्रदेश राज्यात बुलडोझर कार्यवाई केली जात आहे. लोकशाही देशात हे होत असल्याने हे दुर्दैव, युवकांची विविध शहरातून अन्यायकारकपणे अटक करण्यात आली असून धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. आहे असा सवाल सरकारला मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.

आज दुपारी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना सादर केलेल्या निवेदना नंतर ते माध्यमांशी बोलत होते.

निवेदनात निरपराध युवकांची तात्काळ सुटका करावी, धर्मनिंदेविरोधी कायदा करावा. सामुदायिक सौहार्द कायम राहील यासाठी प्रयत्न करावे. दोन समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. कानपूर, बरेली, अहिल्यानगर(अहमदनगर) येथे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. सामाजिक ऐक्य खराब करणा-या विरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी, एड फैज सय्यद, जावेद कुरेशी, मेराज सिद्दीकी, मोहम्मद रजा, आदील मदनी, अब्दुल मोईद हशर, शेख मुनतजीबोद्दीन, अब्दुल मन्नान खान, मतीन पटेल आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow