सावधान...जड वाहनांसाठी पैठणकडे जाणारी वाहतूक 48 दिवस बंद राहणार...पर्यायी रस्त्याचा वापर करावा...!
सावधान...जड वाहनांसाठी पैठणकडे जाणारी वाहतूक 28 दिवस बंद राहणार...पर्यायी रस्त्याचा वापर करावा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) 10 डिसेंबर 2024 सकाळी 6 वाजेपासून 26 जानेवारी 2025 पर्यंत 24 वाजेपर्यंत एकूण 48 दिवसांपर्यंत पैठणकडे जाणारी जड वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार आहे. पैठणला जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे असे आदेश आज पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी काढले आहेत.
जलवाहिनीच्या कामानिमित्त बिडकीन पैठणकडे जाणा-या सर्व जड वाहनाचे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. पैठण महामार्गावरील चितेगांवातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या जलवाहिनी पाईपलाईनचे काम मा.उच्च न्यायालयाचे आदेशाने प्रगतीपथावर असून पैठण जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सदरचे जलवाहिनीचे काम चालू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडून चितेगाव बिडकीन मार्ग पैठणकडे जाणारी तसेच सर्व जड वाहतूक ही वळविणे क्रमप्राप्त आहे. यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते पैठणकडे जाणारी जड वाहतूक बदल करण्यात आलेला मार्ग छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)- वाळूज-ईमामपुरवाडी-रांजनगाव-शेकटा- मार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जातील.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येणारे जड वाहतूक पर्यायी मार्ग पैठण - बिडकीन-शेकटा-रांजनगांव-ईमामपूरवाडी-वाळूज मार्गे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येतील.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते पैठण कडे जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र.52-कचनेर-चौफुली-कचनेर पोरगाव चौफुली-निलजगाव-बिडकीन-मार्ग पैठणकडे जातील.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येणारी जड वाहतूक पर्यायी मार्ग पैठण - बिडकीन-निलजगाव-पोरगाव चौफुली-कचनेर कमान-राष्ट्रीय महामार्ग क्रं.52 मार्ग छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येतील.
हलक्या वाहतूकीसाठी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते पैठण कडे जाणारी हलकी वाहतूक पर्यायी मार्ग छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)-गेवराई तांडा-गिरनेरा तांडा-बोकुळजळगांव-निलजगांव मार्ग बिडकीन व पुढे पैठणकडे जातील.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येणारी हलकी वाहतूक पर्यायी मार्ग पैठण- बिडकीन-निलजगांव-बोकुडजळगाव-गिरनेर तांडा-गेवराई तांडा-मार्गे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कडे येतील.
What's Your Reaction?