हर्सुल परिसरात युवकाचा खून, 15 डिसेंबरला होते लग्न....!

शहरात युवकाचा खुन, 15 डिसेंबरला होते लग्न...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) 6 महीन्यापूर्वी साखरपुडा झाला. 15 डिसेंबरला लग्न ठरलेल्या चेतनानगर येथील तरुण दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे, वय 26, याचा जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. लग्नापूर्वीच घात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना हर्सुल जेलसमोरील एन-13 येथील मैदानावर घडली आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास हि घटना घडली.
सहा महीन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जुने वाद मिटवायचे कारण देत तरुणाला निर्जनस्थळी बोलावून 8 ते 10 जणांनी चाकू व बॅटने जीवघेणा हल्ला केला त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला तेथील नागरिकांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाद मिटवायचा बहाना करत तरुणावर डाव टाकला. आपले शत्रु आपल्या विरोधात कट रचतील यापासून बबलू अनभिज्ञ होता. या घटनेत त्याच्या सोबत असलेला सुमित चव्हाण देखील गंभीर जखमी झाला आहे. बबलूचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घाटीत गर्दी केली. हत्या कोणी व कशासाठी केली हे पोलिस तपासानंतर समोर येईल. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहे.
What's Your Reaction?






