औरंगाबाद, जळगाव, जालन्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
औरंगाबाद, जळगाव, जालन्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) येत्या 3 तासात औरंगाबाद, जालना व जळगाव येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, वा-यासह पावसाचा जोर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तरी नागरीकांनी सतर्क राहावे असा इशारा मराठवाडा, खानदेशसाठी असा संदेश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मोबाईलवर पाठवला आहे तरी नागरीकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कालपासून औरंगाबाद व जालन्यात पाऊस सुरू आहे पण यामध्ये वादळी वारा नव्हता. रिमझिम पाऊस सकाळपासून सुरू आहे.
What's Your Reaction?