औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांचा पत्ता कट, आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का...!

 0
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांचा पत्ता कट, आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का...!

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतून दिग्गजांचा पत्ता कट, अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव जिल्हा बँक निवडणुकीतून बाहेर...

आ. संजना जाधव, चव्हाण, शिरसाट', मानेंसह 45 उमेदवारांचे अर्ज उडाले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या द औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कन्नडच्या आमदार संजना जाधव, विधान परिषदेचे भाजपाचे उमेदवार सुहास शिरसाट', आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार स्व. साहेबराव पाटील यांच्या पत्नी इंदुमती पाटील, कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर, माजी आमदार अण्णासाहेब माने या दिग्गजांसह 45 उमेदवारांचे अर्ज आज झालेल्या छाचणीत बाद झाले आहेत. 

 बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या 4 जुलै रोजी होत असून, या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 158 उमेदवारांनी 214 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी सोमवारी झाली.  या छाननी दरम्यान दाखल आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सम्रत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली याच दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीचा छाननीत अर्ज अवैध ठरलेल्या अर्जांचा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. या सुनावणीत दिग्गजांचे अर्ज बाद झाले आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांचा अर्ज हा सोयगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखा ही त्यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्वार घेण्यात आली असल्यामुळे ते बँकेचे लाभार्थी म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरला असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. अब्दुल समीर यांच्या उमदेवारीवर काकासाहेब फरकाडे यांनी आक्षेप घेतला होता.

23 जूननंतर या निवडणुकीचे चित्र होईल स्पष्ट...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात राहावी, असे मनसुबे आखून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु काही दिग्गज नेत्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज बाद होण्यास सभासदाचा दोन वर्षांचा कालावधी पुर्ण नसणे, अर्जात त्रुटी असणे, ऑडिट वर्ग "क" असणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये 45 जणांचा समावेश असून 169 जणांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा कालावधी 9 ते 23 जून असा असून, 23 जूननंतर या निडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघात अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांचा एकमेव अर्ज दाखल होता, तोही अर्ज अवैद्य ठरला आहे. या मतदार संघात एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहणार आहे.

यांचे उमदेवारी अर्ज ठरले अवैध...

प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. स. सेवा सहकारी संस्था फुलंब्री तालुक्यातून रामेश्वर चोपडे, आमदार अनुराधा चव्हाण यांचा अर्ज अवैद्य ठरला असला तरीही महिला प्रतिनिधी मतदारसंघातील त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे त्या या निवडणुकीत कायम आहेत. सोयगाव तालुक्यातून जयप्रकाश चव्हाण, कन्नडमधून आमदार रंजना चव्हाण, प्रिती पवार, मनोद देशमुख, गंगापूरमधुन इंदुमती साहेबराव पाटील, रुपचंद गाडेकर, वैजापूर तालुक्यातील मंदाबाई सोनवणे, पटेल परवीन नबी यांचा अर्ज बाद ठरला आहे. बिगर शेती संस्था मतदारसंघातून अण्णासाहेब माने, अश्विनी मडके, प्रणिकेत पाटील, खान नुसरत अ. रहेमान कृषी पणन संस्था मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर अब्दुल सत्तार, रितेश मुनोत, काकासाहेब फरकाडे यांचे बाद ठरले आहेत. वैयक्तिक मतदारसंघातून अब्दुल समीर यांचा दुसरा अर्जही अवैध ठरला आहे. याच मतदारसंघातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या पत्नी सुवर्णा जाधव, शोभा निकम, मंदाबाई राठोड, शितल निकम, पटेल परवीन नबी, पूनम मगर, मिनाबाई जाधव, आशाबाई अकोलकर, ज्योतीबाई दाढे, अश्विनी मडके, छायाबाई थोट, चंद्रकला घुले, रतनप्रभा बोरसे यांचा अर्ज बाद झाला आहे.

अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये रुपचंद गाडेकर, प्रदीप शिंदे यांचा समावेश आहे. तसेच इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात सुवर्णा जाधव, विशाल नांदरकर, पुनम मगर, सुहास शिरसाट', दिपक जाधव तसेच माजी आमदार नितीन पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. शिरसाट हे विधान परिषद निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात मनोज राठोड, मंदाबाई राठोड, स्वरुपचंद कुकलारे, मधुकर हांडे या चार उमदेवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमृत जाधव हे काम पाहत असून, त्यांना सहायक निबंधक किरण चौधरी, व्ही. पी. रोडगे हे सहाय करत आहेत.

द औरंगाबाद जिल्हा मध्यमर्ती सहकारी बँकेची येत्या चार जुलै रोजी निवडणूक होत आहे.  संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 113 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारिख 23 जूननंतर स्पष्ट होणार आहे. 1 हजार 112 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क

बजावणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow