लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील ठरवतील तोच एजंडा, मराठा मावळा संघटनेच्या बैठकीत निर्णय
लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील जो एजंडा ठरवतील ते, मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय...!
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे जो एजंडा ठरवतील त्यानुसार मराठा समाज काम करणार असा निर्णय आज मराठा मावळा संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी दिली आहे.
आज मराठा मावळा संघटनेची बैठक छत्रपती संभाजी कॉलेज सिडको येथे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील व शहरजिल्हाध्यक्ष भरत कदम पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीत समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच फसवे आरक्षण देणा-या सरकारचा निषेध करून येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जो अजेंडा राहील त्यानुसार काम करणार असे प्रा. शिंदे पाटील यांनी सांगितले. यावेळी अनेक नविन महिला व पुरुष यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी मराठवाडा महिला कार्याध्यक्षा कल्पना चव्हाण पाटील, मराठवाडा संपर्क प्रमुख माधव दुधाटे पाटील, महिला जिल्हाध्यक्षा रंजना कोलते पाटील, महिला कार्याध्यक्षा शोभा वाकळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल मते पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समाधान शिंदे पाटील, पश्चिम तालूकाध्यक्ष तुषार जाधव पाटील, दिपक राऊतराय, शहर संघटक ऋषिकेश साठे पाटील, कन्नड तालुका युवक संपर्कप्रमुख अक्षय चोंधें पाटील, महिला जिल्हा संपर्कप्रमुख मनिषाताई दांडेकर, जया पाटील, विठ्ठल निंबाळकर, सुनिता पाटील, सुरज सपकाळ पाटील, समाधान भुमे पाटील, सुदर्शन बोरुडे पाटील, सुवर्णा दाभाडे पाटील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?