सफा बैतूल मालने शंभर महीलांना शिलाई मशीन वाटप करुन रोजगार मिळवून दिला
सफा बैतूल मालने शंभर महीलांना शिलाई मशीन वाटप करुन रोजगार मिळवून दिला
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.24(डि-24 न्यूज) सफा बैतूल माल मागिल अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. आज सफा एज्युकेशनल एण्ड वेल्फेअर ट्रस्ट व रहेबर फाऊंडेशनच्या वतीने मौलाना आझाद हायस्कूलच्या मैदानावर शंभर गरजू महीलांना शिलाई मशीन वाटप करुन रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
सफा बैतूल मालच्या वतीने शहरातील आठ स्लम वस्तीमध्ये गरीबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दवाखाने व डोळे तपासणीसाठी दवाखाने सुरू आहे. मुफ्ती अनिसुर्रहमान यांच्या अध्यक्षतेखाली हे सामाजिक कार्य सुरू आहे. आज सर्व जाती धर्मातील गरजू शंभर महीलांचे सर्वेक्षण करून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मागिल वर्षी शंभर हातगाडी पाले भाज्या सहीत वाटप करुन रोजगार मिळवून दिले होते.
आजच्या कार्यक्रमात मौलाना मुफ्ती मोईजोद्दीन कासमी, मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई, डॉ.गफ्फार कादरी, ख्वाजा शरफोद्दीन, आरटिओ मिर्झा शाहेद बेग, साजिद मौलाना, मौलाना डॉ.अब्दुल रशिद, अयूब सेठ आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?