घाटी परिसरातील अनधिकृत खानावळी व मेडीकलवर चालला बुलडोझर

 0
घाटी परिसरातील अनधिकृत खानावळी व मेडीकलवर चालला बुलडोझर

घाटी मुख्य प्रवेशव्दारा समोरील अतिक्रमणे जमीनदोस्त...

20 अनाधिकृत दुकाने जमीनदोस्त...

 

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.20(डि-24 न्यूज)

 आयुक्त तथा प्रशासक यांचे आदेशानुसार आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) मुख्य प्रवेशव्दारा समोरील अतिक्रमणे निष्काशीत करण्याची कार्यवाही करण्यात आली. 

सदर कारवाई दरम्यान एकूण 20 अनाधिकृत दुकाने निष्काशीत करण्यात आली. सदर दुकाने अपंग व्यक्तींना तात्पुरत्या स्वरुपात (11 महिने) उदरनिर्वाह करिता देण्यात आली होती. परंतु सदर अपंग व्यक्तींनी दुकानामध्ये अनाधिकृत पणे पोटभाडेकरु ठेवले होते. एकूण 20 दुकानां पैकी 7 दुकाने नगर परिषदेच्या काळात देण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने सन-2022 पासून परवाना नुतनीकरण बंद केले होते. सदर दुकांनदारांनी दुकानासमोर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे मार्फत सदर अतिक्रमणे हटविण्या करीता वारंवार पाठपुरावा सुरु होता. त्या अनुषंगाने व प्रशासकांच्या आदेशान्वये सदर दुकाने निष्काशित करण्यात आली. एकूण 20 निष्काशित अतिक्रमणा पैकी 8 मेडिकल स्टोअरचा व्यवसाय व इतर 12 हे अन्य व्यवसाय (खानावळ, चहा नाष्ट सेंटर, इ.) होत्या. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त-2 तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे, यांचे मार्गदर्शानाखाली उपायुक्त-1 सविता सोनवणे, मंगेश जगताप पोलीस निरीक्षक बेगमपूरा पोलीस ठाणे, मालमत्ता अधिकारी संजय चामले, सहायक आयुक्त झोन क्र.1 संजय सुरडकर अतिक्रमण निरिक्षक मजहर अली, 

मुकेश खडसे, इत्यादी ने पार पडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow