प्रबोधनात्मक पथनाट्याच्या माध्यमातून माणसाला ही माणूस जिवंत करण्याचा प्रयत्न, खुल्या कारागृहात पथनाट्याचे सादरीकरण

 0
प्रबोधनात्मक पथनाट्याच्या माध्यमातून माणसाला ही माणूस जिवंत करण्याचा प्रयत्न, खुल्या कारागृहात पथनाट्याचे सादरीकरण

प्रबोधनात्मक पथनाट्याच्या माध्यमातून माणसातला ही 'माणूस' जिवंत करण्याचा प्रयत्न

पैठण येथील खुल्या कारागृहात प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरिकरण

पैठण,दि.16(डि-24 न्यूज)

राष्ट्रीय मानवअधिकार दिनाच्या निमित्ताने मध्यवर्ती कारागृह (हर्सूल) औरंगाबाद येथील सादरीकरणानंतर पैठण येथील खुल्या कारागृहातील बंदीसमोर 'रागाला घाला आला,गुन्हेगारी टाळा' ह्या प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.जिल्हा न्यायालय,जिल्हा वकील संघ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिक कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पथनाट्याच्या माध्यमातून कारागृहातील उपस्थित बंदी(कैदी)यांना त्यांचे अधिकार हक्क,यासोबत गुन्हा घडल्यानंतर कुटुंबाची होणारी अवहेलना कौटुंबिक,शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक संकट यावर वेगवेगळ्या घटनांचा क्रम दाखवून प्रकाश टाकण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संबधित पथनाट्य सादर केले. बंदी हा कितीही मोठा गुन्हेगार असला तरी देखील त्याच्या कुटुंबीयाप्रती त्याची आत्मियता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव हा कायम असतोच. बंदीच्या हातून एखादा गुन्हा घडला म्हणजे तो जन्मापासून गुन्हेगार आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर त्याच्याकडून ती त्यावेळेस रागाच्या भरात अनावधानाने झालेली चूक असू शकते. मात्र,ती घटना घडून काही काळ लोटल्यानंतर त्याला केलेल्या गोष्टीचा प्रचंड पश्चाताप झालेला असतो. तो बंदी पश्चाताप व्यक्त करत असतो.बंदी काळात(कारागृहात) गेल्यामुळे घर, परिवार, नातेवाईक व मित्रमंडळी या सगळ्यांपासून तो दुरावलेला असतो. बंदीमुळे आपल्या परिवाराला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत जावे लागत असते. अशा सर्व घटनाक्रम दाखवण्याचा प्रयत्न या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी तेंव्हा समोर बसलेल्या अनेक प्रेक्षक रुपी बंदी बांधवांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तर काहींनी मात्र आपल्याला भावनांना अश्रूच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. प्रेक्षक रुपी बसलेल्या बंदी बांधवांमध्ये असा एकही बंदी नव्हता की,ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहले नाही. हे पथनाट्य बंदी बांधवांच्या काळजापर्यंत जाऊन पोहोचले.पथनाट्य पाहण्यासाठी आलेले अतिथी मान्यवर यांनाही अश्रू अनावर झाले शेवटी माणूस तो माणूस असतो. मात्र या पथनाट्याच्या माध्यमातून त्या कठोर माणसातला ही ' माणूस ' जिवंत करण्याचा प्रयत्न नक्कीच सामजिककार्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थीनी केला.

यावेळी श्री.एस. एम. कोचे जिल्हा सत्र न्यायाधीश, औरंगाबाद, जयंत नाईक(अधीक्षक,मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद),धनसिंग कवाळे,(अधीक्षक, पैठण खुले कारागृह) सदानंद‌ सोनुने (सचिव,जिल्हा वकील संघ) प्रा.डॉ.श्री. रमेश गावित सर (प्राध्यापक,समाजकार्य महाविद्यालय),सारीका पुरी मॅडम( जिल्हा सत्र न्यायालय, औरगाबाद),श्रीनिवास तलवार,(उपाध्यक्ष, जिल्हा वकील संघ),महादेव डोंगरे,दादासाहेब लहाने(सामाजिक कार्यकर्ता), कन्हैया शर्मा, अंजली साबळे, अनिल ढगे, बाळासाहेब चव्हाण दादाराव चव्हाण आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow