आयटकच्या 4 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा व जेलभरो, अटक व सुटका

 0
आयटकच्या 4 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा व जेलभरो, अटक व सुटका

आयटकच्या 4000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा व जेल भरो

कामावरून कमी करण्याच्या नोटिसांचा तीव्र निषेध...

औरंगाबाद, दि. 17(डि-24 न्यूज) गेल्या 45 दिवसापासून आपल्या विविध मागण्यासाठी संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटीसा देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ व त्यांच्या अंगणवाडीची कुलपे तोडण्याच्या धमक्याच्या निषेधार्थ आज आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने क्रांती चौकापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सुमारे चार हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला व जिल्हा परिषदेवर मोर्चा पोहोचल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या व तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्ण जाधव यांच्या दडपशाहीच्या धोरणांच्या विरोधात त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत विकास मीना भेटत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेचे गेट सोडणार नाही व जेलभरो आंदोलनही सुरू करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेल्या विकास मीनांना पोलिसांनी ही माहिती दिली. एक तासानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयातून विकास मीना जिल्हा परिषदेत पोहोचले व त्यानंतर आयटकच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी त्यांनी पाचारण केले.

 यावेळी विकास मीना यांच्याशी चर्चेदरम्यान वादावादी जिल्ह्यातील 14 प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या नोटीस कशा दिल्या नोटीसा देण्यात आपण गंभीर आहात काय अंगणवाडी सेविकेच्या व मदतनीस यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या मोबाईलवर नोटीस कशा काय पाठवल्या समक्षनुकीचा का दिल्या नाहीत ग्रामपंचायत समक्ष नोटीसह का देण्यात आले नाहीत किंवा रजिस्टर पोस्टाने नोटीस का पाठवण्यात आलेल्या नाहीत अशा प्रश्नांचा भडीमार केला असता मी शासनाचा जिल्हा परिषदेच्या प्रमुख असून कायद्याप्रमाणे मला कारवाई करणे भाग आहे असे मीना म्हणाले. कायद्याप्रमाणे तुम्ही जरूर कारवाई करा परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर नोटीसा न पाठवता नातेवाईकांच्या मोबाईलवर नोटीसा का पाठवल्या...? ग्रामपंचायतीवर नोटीस का चिकटवले... ? जिल्हा परिषदेच्या गेटवर किंवा सिईओच्या केबिनच्या दारावर आम्ही खुलासा चिटकवला तर चालेल काय...? आदी प्रश्नांची सरबत्ती केली. ग्रामपंचायतीवर नोटीसा चिटकवणे बरोबर नसल्याचे आयटकने मीना यांच्या निदर्शनास आणले.

मीना यांनी अंगणवाड्यांच्या किल्ल्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन आंदोलकांना केले मात्र सरकारी कर्मचारी संपावर जातात किंवा गॅजेटेड ऑफिसर्स संपावर जातात तेव्हा त्यांच्या कपाटाच्या चाव्या कोणाजवळ असतात ? असा उलट सवाल आयटकच्या वतीने करण्यात आला. मुलांचे कुपोषण होत असल्यामुळे त्यांच्याशी आपली बांधिलकी पाहिजे असे विकास मीना म्हणाले तेव्हा संपावर जाण्याची नोटीस वीस दिवस अगोदर दिलेली होती त्या वीस दिवसाच्या काळात बालकांच्या कुपोषणाची काळजी आपल्याला का वाटली नाही ? तसेच अंगणवाड्यात ठेकेदारांमार्फत पुरवण्यात येणारे धान्य हे सडलेले किडके कमी प्रतीचे असते तेव्हा कुपोषण होत नाही काय ? असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला.

 यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या निदर्शनावेळी विकास मीनाने चर्चा करण्यास नकार दिला होता त्याचे स्मरण करून देण्यात आले व त्या घटनेचा सर्वप्रथम निषेध करण्यात आला. चर्चा करायला तयार नसाल तर कैबीन मध्ये घुसून घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांना देण्यात आला. विकास मीना यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषद गेटवरून जेलभरो आंदोलनाची तयारी करत असतानाच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संपत शिंदे यांनी जेलभरोला परवानगी नाही तुम्हाला करता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्याचाही आयटकने तीव्र निषेध केला जेलभरोला परवानगी नसते किंवा उपोषणाला देखील परवानगी नसते याची आठवण आयटकने करून दिली. जेलभरो म्हणजेच कायदेभंग आंदोलन असते आणि आम्हाला कायद्याचा भंग करून जेलभरो सत्याग्रह करायचा आहे तुम्ही आम्हाला अटक करा. परवानगीची गरज नसते हे त्यांना सुनावले त्यानंतर 20-20 जणींच्या गटाने जिल्हा परिषदे समोरच्या रस्त्यावर ठाण मांडून जेल भरो सत्याग्रह करण्यात आला. सुमारे तीन तास चाललेल्या या जेलभरो सत्याग्रहात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अटक करून जिल्हा परिषदेच्या मैदानावर नेण्यात आले. आपल्या सोबत आणलेली चटणी भाकर किंवा जेवण आणणाऱ्या रस्त्यावरच जेवत बसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लेडीज पोलीस काठ्याने डिवचत होत्या व रस्त्यावर बसून जेवण करू नका, रस्ता अडवू नका असे म्हणत होत्या. याचाही आयटकने तीव्र निषेध केला. जेलभरो आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच बसावे लागते व रस्ता अडवल्यामुळे पोलिसांनी अटक करायची असते. त्यामुळे त्या रस्त्यावर बसलेल्या आहेत. जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत त्या जेवत आहेत. त्यांना जेवताना उठवू नका असे आवाहन आयटकने केले आयटकने पोलिसांना केले तरीही पोलीस ऐकायला तयार नसल्यामुळे शेवटी हजारो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले व घोषणाबाजी सुरू केली. अटक झाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही आयटकच्या पुढार्‍यांनी जाहीर केले. पोलिसांच्या या कृतीचा आयटकनी निषेध केला आजच्या मोर्चा चे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष काँ.प्राध्यापक राम बाहेती, संघटक कॉ.अनिल जावळे, जिल्हा सचिव तारा बनसोडे, आयटकचे राज्य कौन्सिल सदस्य अभय टाकसाळ, शालिनी पगारे विलास शेंगुळे, राजू हिवराळे, ज्योती गायकवाड, माया दिवसांनी, अनिता पावडे, माया भिवसाने, उषा शेळके, सुनीता शेजवळ, संगीता अंभोरे ,विमल वाडेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती 

वैशाली मकासरे, अर्चना घाटे, मनीषा भोळे, सुलोचना कांबळे, अश्विनी थोरात, अमृता पांडे, गीता पांडे, उषा गलांडे, मीरा आडसरे, मंगल धत्तिंगे, कविता वाहूळ, विमल वाडेकर, नाजनीन पठाण, अनिता मोकळे, सुरेखा जोशी, नुरजहा पठाण, बेबी डिडोरे, अलकनंदा डिडोरे, सुनीता गिरी, वैशाली कांबळे, बेगम अख्तर, एजाज शेख, विजय रोजेकर, जफर फजलु रहमान आदी सह सर्व तालुक्यातील सुमारे चार हजार कर्मचारी या मोर्चात सहभागी झालेल्या होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow