आरक्षणाचा प्रश्न सामुदायिक समन्वयातून सोडवावा- खा.शरद पवार

 0
आरक्षणाचा प्रश्न सामुदायिक समन्वयातून सोडवावा- खा.शरद पवार

आरक्षणाचा प्रश्न सामुदायिक समन्वयातून सोडवावा- खा.शरद पवार  

मराठा आंदोलकांनी त्यांच्याशी भेट घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. हे महाराष्ट्रासाठी बरोबर नाही. राज्याची एकता अखंडता टिकली पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन एका समाजातील लोक दुसऱ्या समाजातील हाॅटेलात जात नाही असे चित्र दिसून येत आहे. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सुसंवाद वाढवला पाहिजे चर्चा केली पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ओबीसींचे नेते छगन भुजबळ, गणेश हाके यांना एकत्र आणून त्यांचीशी चर्चा केली पाहिजे. सामुदायिक प्रयत्नातून समन्वयातून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. आपल्या पक्षाची भूमिका सुसंवादाची आहे, चर्चेची आहे असे ते म्हणाले.

जरांगेंनी मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम आरक्षण मिळाले पाहिजे असे भाष्य केल्याने यावर चर्चा करुनच तोडगा निघेल. आरक्षणाचा प्रश्न राज्यात सोडवला पाहिजे दिल्लीत सूटणार नाही असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भाजपच्या मेळाव्यातून केली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील ओबीसी आरक्षणाबद्दल आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पवार यांना विचारले असता ते बोलत होते. पवार म्हणाले दोन समाजांमध्ये तेढ वाढत आहे याची मला काळजी आहे. त्याच बरोबर दोन – तीन जिल्ह्यात अशी परिस्थिती अधिक आहे, या बद्दल काळजी घेणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या मुद्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी देखील आपली चर्चा झाली. हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी सरकारने जनतेमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे. परंतु सरकार असे न करता सरकार मधील एक गट जरांगे यांच्याशी चर्चा करीत आहे, दुसरा गट ओबीसींच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहे तर काही जणांना या वेगळे ठेवले जात आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. सरकारने मराठा आंदोलक, ओबीसी आंदोलक, छगन भुजबळ यांना एकत्र आणून चर्चा करावी, संवादाने – समन्वयाने हा प्रश्न सोडवावा. यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत.

महाविकास आघाडी एकसंघ रहावी असाच आमचा प्रयत्न आहे. एकसंघ राहण्यास मुर्त स्वरुप न आल्यास लोकसभा निवडणूकीसारखे निकाल विधानसभा निवडणूकीत लागतील असे वाटत नाही असे शरद पवार यांनी या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. केंद्रातील सरकार सहा महिन्यात पडणार, वर्षभरात पडणार असे सांगितले जात आहे, खरेच हे सरकार पडणार आहे का असे पत्रकारांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, जोपर्यंत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत तो पर्यंत सरकारला काही अडचण नाही. मागील दहा वर्ष भाजपचे बहुमत होते, आता तशी स्थिती नाही. एका मुठीतले सरकार आता राहिलेले नाही.

आपल्या पक्षात काही लोकांनी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे असे सांगताना शरद पवार म्हणाले, असे असले तरी सरसकट प्रवेश दिले जाणार नाहीत. ज्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करायचे याचा निर्णय पक्ष करेल. लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनेबद्दल त्यांनी टीका केली. या योजनेचा एखादा हप्ता निवडणूकीपूर्वी देवून जनमानस आपल्याकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, त्यांनी या योजना पूर्वीच का जाहीर केल्या नाहीत असा सवाल त्यांनी केला. मोदींनी अशा योजनांना रेवडी म्हटले होते. रेवडी वाटप केल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही आता मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी. 

‘तो’ दिवा तरुंगात पाहिला...

शरद पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ‘तडीपार’ असा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे असे म्हटले. या बद्दल पत्रकारांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, त्यावेळी ‘तो’ दिवा आम्ही महाराष्ट्रातील तुरुंगात पाहिला होता.

‘ती’ माझी चुक होती...

आरक्षणाबद्दल निर्माण झालेला प्रश्न चर्चेतून सोडवावा, सरकारने जनतेत जावे असे सांगताना शरद पवार यांनी स्वत:चाच एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मी त्यावेळी मुंबईत बसून घेतला. त्यानंतर गोरगरीबांना मोठा झळ पोहोचली. त्यानंतर मी जनतेत जाऊन चर्चा केली, त्यांना भूमिका समजावून सांगितली आणि पुन्हा एकदा नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा विरोध झाला नाही. मुंबईत बसून मी तो निर्णय घेतला, ती माझी चुक होती.’ यावेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, आ. राजेश टोपे, खा.डॉ.कल्याण काळे, जयसिंगराव गायकवाड, जालना जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow