पवित्र हज यात्रेत शहरातील दोन हज यात्रेकरुंचे निधन, मक्का मध्ये दफनविधी संपन्न

 0
पवित्र हज यात्रेत शहरातील दोन हज यात्रेकरुंचे निधन, मक्का मध्ये दफनविधी संपन्न

हज यात्रेत दोन हज यात्रेकरुंचे निधन, मक्का मध्ये दफनविधी संपन्न

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)

पवित्र हज यात्रा 2025 मध्ये हज संपन्न झाल्यानंतर शहरातील दोन हज यात्रेकरुंचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

कटकट गेट येथील रहीवाशी प्लाॅटींग व्यवसायिक रहीम अहेमद नजीब(वय 41) हे आपल्या पत्नीसोबत पवित्र हज यात्रेसाठी गेले होते. पवित्र हज यात्रा संपल्यानंतर हरम शरीफ मध्ये तवाफ करताना ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छावणी येथील रहीवाशी छोटी मस्जिद कमेटीचे अध्यक्ष सय्यद अर्शद सय्यद अब्दुल रहेमान(वय 60), सेवानिवृत्त एनसिसि विभाग, यांचे मक्कामध्ये निधन झाले. दोघांची नमाज-ए-जनाजा संपन्न झाली. मक्का येथील कब्रस्तानात दोघांचा दफनविधी करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow