महिला सक्षमीकरण करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

 0
महिला सक्षमीकरण करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

महिला सक्षमीकरण करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले.

याप्रसंगी वेलकम शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेचे अॅड अजहर पठाण, राष्ट्रवादी महिला जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली पाटील, लाईफ केअर एनिमल संस्थेचे सचिव जयेश शिंदे, अनिल साळवी, श्रीमती प्रमिला, नंदा संतोष भालेराव, माया लोंढे, शेख मतीन आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी शासन निर्णय नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 29 मार्च 2022 यामध्ये सर्व जिल्ह्यांतील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यामध्ये वार्षिक एकूण उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसूलातील 5 टक्के तरतूदीतून संदर्भ शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या योजना कामे राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

64 शासकीय योजनांचा लाभ गरजूंना पोहचवून योजनेचा उद्देश पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बैठकीत हा विषय घेत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

निवेदनात सोबत 64 योजनाची यादी देण्यात आली...

1 मुलगी जन्माला आल्यावर तीच्या सर्वांगीण विकाससाठी आर्थिक मदत करणे 

2 मुलीकरिता शिष्यवृती योजना राबविणे 

3 मुलींची शाळा गळती प्रमाण थांबविणे 

4 विधवा निराधार महिलेंच्या मुलींच्या विवाहकरिता अर्थसाह्य देणे  

5 वाचनालय अभ्यासिका सुरू करणे 

6 मुली व महिलांना स्पर्धा परीक्षेसाठी अर्थसहाय्य करणे upsc, mpsc staff selection baniking या सारख्या 

7 महानगर्पालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे. 

8 यूवतींना 12 वी नंतरचे उच्च शिक्षण व परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थ साह्य  

9 मुलीसाठी /महिलासाठी आतत्याधुनिक सव्छतग्रह बांधणे 

10 मुलींची माहीलामध्ये प्रसाधन गृह मध्ये सायनिटरी नॅप्किन व्हेडिंग मशीन उपलबद्ध करणे 

11 दुर्धर आजारने ग्रासलेल्या महिलाना neet/rtgs/ecs द्वारे अर्थसाह्य करणे 

12 मुलीसाठी /महिलासाठी वैद्यकीय तपासणी शिबीर घेऊन औषधोपचार साठी मदत करणे

13 महिला व बालके करिता व्यायाम शाळा उभारणे 

14 महिलासाठी योगा व प्रक्षिक्षण घेणे 

15 देहविक्रि करणार्‍या महिलासाठी आरोग्यविषयक कार्यक्रम घेणे 

16 आशा एड्स नियतरान कार्यक्रम 

17 जन्नणी शिशु सुरक्षा कार्यक्रम 

18 ज्या महानगरपालिका क्षेत्रातून राष्ट्रीय/राज्य/जिल्हा मार्ग जातात त्या रस्त्यावर महिलासाठी सव्छता गृह सोय व हिरकणी कक्ष उभरावे 

19 किशोरवयिन मुलींना लैंगिक शिक्षण मासिक पाळी व आरोग्यविषयक जनजागृती करणे 

20 महिलासाठी/ समुपदेशन केंद्र चालविणे हेल्पलाइन चालविणे,विधी सल्ला केंद्र चालविणे 

21 बाल कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम चालविणे 

22 काळजी व सरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी काम करणार्‍या नोंदणीकृत संस्थान अर्थसाहय करणे 

23 महिलासाठी आरोग्य /हुंडा बंदी/ स्त्री भ्रूण हत्या जनजागृती कार्यक्रम राबविने 

24 मुलगी दत्तक योजना हाती घेणे 

25 पीडित महिलाकरिता अस्तित्व पुनर्वसन योजना सुरू करणे 

26 नोकरी शिक्षण करणार्‍या मुली व माहीलाच्या वसतिगृह मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण 

 27 महानगरपालिकेकडून महिला व मुलाकरिता नव्याने वसतिगृह सुरू करणे. 

28 बेघर महिलांसाठी रात्र निवारा प्रकल्प सुरू करणे 

29 महिला बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्याची तसेच बटवे व इतर कापडी वस्तूची निर्मिती करून वितरीत करणे  

30 नोंदणीकृत बचत गटांना अनुदान देणे 

31 महिला बचत गटांना खेळते भांडवल अर्थसाह्य देणे 

32 महिला बचत गट निर्मित उत्पादन विक्री /खाद्य महोत्सव आयोजित करणे/ सायणीटरी मार्टची निर्मिती करणे 

33 महिला बचत गटांना व्यवसायिक करिता शिलाई मशीन खरगंटी पापड मशीन मिरची मशीन मसाला ग्राइंडर सेवा मशीन यासारख्या मशीन साठी अर्थसहाय्य देणे 

34 बचत गटामार्फत उपहारगृह चालविणे.

 

35 महिलांनी तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ करिता कायमस्वरूपी विक्री केंद्र निर्माण करणे 

 

36 इलेक्ट्रिक दुचाकी टू व्हीलर ऑटो रिक्षा करिता अर्थसहाय्य देणे 

 

37 मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे 

38 अनैतिक व्यापारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिला मुली यांच्या करिता त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुनर्वसनाची योजना राबविणे 

39 मुलींना व महिलांना व बचत गटातील महिलांना व्यवसायिक डिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणे एमएस-सीआयटी टॅली टायपिंग ड्रायव्हिंग ..

 

40 असंघटित महिलांना लघु उद्योगाचे प्रशिक्षण देणे.

41 व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबविणे 

42 गुणगौरव कार्यक्रम हाती घेणे 

43 क्रीडा सुविधा निर्माण करणे 

44 महिला व मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे व त्यांच्याद्वारे त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे 

45 मुली व महिला खेळांसाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडू करीता शिष्यवृत्ती देणे 

46 मुली/ महिलांना संरक्षणासाठी कराटे योगा मार्शल आर्ट यासारखे प्रशिक्षण देणे 

47 विज्ञान शोधिका 

48 संगणक वर्ग प्रकल्प 

 

49 65 वर्षावरील ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे.

50 विधवा निराधार महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे.

51 विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबविणे 

52 व्यवसायिक प्रयोजनात अपारंपारिक ऊर्जा साधने घेण्यास अर्थसाह्य देणे 

 

53 योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पुस्तिका जाहिरात चित्रपट यासारखे उपक्रम राबविणे 

54 मुलांकरिता पोषण आहार पुरविणे.

55 पाळणाघर चालवणारा शासकीय संस्थांना अर्थसहाय्य करणे 

56 नागरी भागातील अंगणवाडी केंद्र बांधकाम करणे 

57 बौद्धिक क्षमता वर्धनाकरिता साहित्य खरेदी करणे 

58 बालकांच्या वृद्धी सहनियंत्रणासाठी ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइसेस ची आवश्यकतेनुसार खरेदी तसेच दुरुस्ती करणे 

59 शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे 

 60 रँक स्पीकर्स यांचा विमा कारणे व त्यांच्या मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य करणे 

61 बालकांचे लसीकरण विनामूल्य करणे 

62 दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांकरीता विषय सहाय्य उपाययोजना करणे 

63 कुपोषित बालकाकरिता विशेष आहार पुरवठा करून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करणे 

64 पोषण पुनर्वसन केंद्र एनआरसी बाल उपचार केंद्र सिटीसी स्थापन करणे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow