शिक्षकदिनी शिक्षकांना करावे लागले आंदोलन...!

 0
शिक्षकदिनी शिक्षकांना करावे लागले आंदोलन...!

शिक्षक समितीचे सामुहिक रजा आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील 2513 शिक्षकांची सामुहिक रजा

औरंगाबाद ,दि.5(डि-24 न्यूज) शिक्षकांच्या 152 अशैक्षणिक कामांचा बोझा लादल्याने व 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घकाळ दुर्लक्षित आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कुठेही गंभीर नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संबंधाने घरभाडे भत्ता कपात करून वेठीस धरले जात आहे.त्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने सामुहिक रजा आंदोलन करण्याचे राज्य शाखेच्या आदेशानुसार आज शिक्षक दिनी जिल्ह्यातील जवळपास 2513 शिक्षकांनी सामुहिक रजा आंदोलनात सहभाग घेतला. तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, सर्व जिल्ह्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदेच्या गटशिक्षणाधिकारी यांना यापूर्वीच दिले गेले होते.

शिक्षक समितीने यापूर्वी सर्व जिल्ह्यातील सर्व जि.प कार्यालयासमोर 15 जुलै रोजी धरणे आंदोलन केले होते आजचे हे दुसरे आंदोलन होते.

15 जुलै रोजी धरणे सत्याग्रह करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शासनाची भूमिका अत्यंत नकारात्मक असल्याने शिक्षकांना सनदशीर आंदोलनाशिवाय तरणोपाय राहिलेला नाही. शिक्षक दिनाच्या दिवशी दरवर्षी एक दिवस शिक्षकांचा गौरव आणि सन्मान करण्याची भाषा बोलली जाते. मात्र शिक्षकांच्या न्याय मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्षभर सातत्याने उपमर्द केला जात आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यातील प्राथमिक शिक्षक 'एक दिवसाची सामूहिक किरकोळ रजा' घेऊन शासनाच्या उदासीन धोरणाविषयी सामुहिक रजा आंदोलन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली

शिक्षक समितीच्या या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची दखल न घेतल्यास पुन्हा तिसऱ्या टप्प्यात नागपूर अधिवेशनावर तर चौथ्या टप्प्यात दिल्लीत संसदभवनावर शिक्षक समितीच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे. आज जिल्हा अध्यक्ष विजय साळकर, राज्य प्रवक्ते नितीन नवले सरचिटणीस रंजित राठोड, शाम राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. सामूहिक रजा आंदोलनात प्रमुख्याने शालिराम खिस्ते, गुलाब चव्हाण, अशोक डोळस, कडूबा साळवे, भाऊसाहेब बोर्डे. टि.के पुनवटकर,

जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी, रऊफ पठाण, पंडीत भोसले, बबन चव्हाण , विलास चव्हाण, एकनाथ पठाडे, प्रविण गायकवाड, संजय शेळके उर्दू जिल्हाध्यक्ष जावेद अन्सारी, पाशु शहा, गौस शेख, महिला जिल्हाध्यक्ष मंगला मदने, वर्षा देशमुख, जयश्री राठोड, प्रीती जाधव, वैशाली इंगळे, शितल भडांगे, वैशाली हिवर्डे,

के के जंगले, के.डी.मगर,

लक्ष्मीकांत धाडवळे,

राजू ठाकूर, नामदेव चव्हाण, अंकुश वाहूळ, दत्तात्रय खाडे, पंकज सोनवणे, दिलीप ढमाले, दत्तात्रय थोरात, दिलिप रासने, विष्णू भंडारे, सुनिल बडे, राजेंद्र नागे, भिमराव पंडीत, अशोक बडे, दादु नरवडे, प्रविण उंडाळे कैलास ठेपले, प्रकाश जायभाये, अशोक सोनवणे, राजू डिके, दादासाहेब तुतारे, गंगाराम घुमरे, विलास साळुंखे,अतूल गायके, मच्छिंद्र निमोणे, निंबा साळुंके, विलास साळुंखे, चंदू लोखंडे, गणेश अवचार, 

अंकुश इथर, अनमोल शिंदे, काकासाहेब रोठे, कालिदास रणनवरे, रवींद्र वामन, राजेंद्र मुळे, शिवाजी डुकरे, सिंकदर घोडके, सुनील अहिरे, अर्जुन पिवळ, सुनील बोरसे, संगिता मते, शितल चव्हाण, रेणुका शिंदे, फातिमा बाजी, सुनिता चितळकर, अर्चना गोर्डे, शीलाताई बहादुरे, क्षिरसागर मॅडम, कल्पना नाईक, यादींसह जिल्ह्यातील 2513 जणांनी आंदोलनात सहभाग घेतल्याचे सतीश कोळी यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow